आपली संसद ही निव्वळ एक टपाल कार्यालय होऊन बसली आहे का?
अलीकडच्या काळात आवाजी मतदानाद्वारे मंजुरी घेण्याची प्रथा पडली असल्यामुळे खासदार मंडळी विधेयकांवरील चर्चेच्या काळात आता संसदेत येऊन आपली हजेरी नोंदवण्याचीदेखील तसदी घेत नाहीत. एकीकडे असेही चित्र दिसते आहे की, संसदेची उत्पादकता लक्षणीयरित्या वाढलेली आहे, मात्र चर्चेची, वाद-संवादाची परंपरा हरवू लागली आहे.......